स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन आता दुप्पट
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
दरमहा २० हजार रुपये निवृत्तीवेतन
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१७ :- भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्ती वेतन दुप्पट होणार आहे. आता दरमहा २० हजार रुपये इतके निवृत्ती वेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोनाच्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मुल्याधारित, मालमत्ता दर न बदलण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध सेवाविषयक लाभ,
राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र कुलगुरु यांची निवड आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहीत केल्याप्रमाणे होणार. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याचेही ठरविण्यात आले. नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी आता १५ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी ३५ हजार ६२९ कोटी रुपये कर्जरुपाने उभारण्यास मंजूरी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.