भिवंडीत गोवरची साथ, ३७ रुग्ण आढळले
ठाणे दि.१६ :- ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात गोवरची साथ पसरली आहे. या आजाराचे २७१ संशयीत रुग्ण आढळून आले. यापेकी १०९ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठविण्यात आले होते. यापैकी ३७ रुग्ण गोवर रुबेला बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
गोवरबाधित रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांनी गोवर रुबेलाचा एकही डोस घेतलेला नव्हता, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत विशेष गोवर रुबेला लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहे. गोवर हा आजार लहान मुलांमध्ये आढळून येतो.
गोवर रुबेला आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता यावर नियंत्रण, उपाययोजना आणि विचार विनिमय करण्यासाठी खासगी बालरोग तज्ञ, सामाजिक संस्था, शिक्षण विभाग, अंगणवाडी पर्यवेक्षक, तसेच धर्मगुरु, मौलाना यांची बैठक घेण्यात आली असल्याचे, महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.