डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई, दि.१६ दादर पश्चिम येथील इंदू मिल परिसरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी या कामाची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
या स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेतीनशे फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून वाचनालय, वाहनतळ मोठे सभागृह बांधण्यात येणार आहे.
स्मारक उभारणीचे काम समाधानकारकरित्या सुरू असून मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. मात्र त्यापूर्वीच ते पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत दाखल करू असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.