‘गोष्ट एका पैठणीची’ येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होणार
मुंबई दि.१६ :- ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट ठरलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट येत्या २ डिसेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रकाशित करण्यात आले.
या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा प्रीमिअर नुकताच सिंगापूर येथे झाला. एका सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणीच्या स्वप्नाचा प्रवास चित्रपटात दाखविण्यात आला आहे.
चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन शंतनू रोडे यांचे असून चित्रपटाची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली आहे.