कर्नाक उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर २७ तासांचा मेगाब्लॉक
बेस्टची विशेष सेवा
मुंबई दि.१६ :- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मशीद रोड रेल्वे स्थानकदरम्यानचा धोकादायक कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी येत्या १९ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बरवरील दररोज धावणाऱ्या एकूण १ हजार ८१० पैकी १ हजार ०९६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने ४७ जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
ब्रिटिशकालिन कर्नाक उड्डाणपुलाचा रेल्वे हद्दीतील भाग पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी १९ ते २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री २ वाजेपर्यंत २७ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा, वडाळा दरम्यान उपनगरी सेवा बंद राहणार आहे.
बेस्ट बसफे-या पुढीलप्रमाणे
बस क्रमांक ९ वडाळा ते कुलाबा आगार,
बस क्रमांक १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दादर स्थानक पूर्व
बस क्रमांक २ लिमिटेड भायखळा स्थानक पश्चिम ते कुलाबा आगार
बस क्रमांक सी १० ईलेक्ट्रीक हाऊस ते वडाळा स्थानक पश्चिम बस क्रमांक ११ लि. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धारावी आगार,
बस क्रमांक १४ डॉ.एस.पी.एम.चौक ते प्रतिक्षा नगर,
बस क्रमांक ए ४५ मंत्रालय ते एमएमआरडीए सिटी (माहुल),