अबू आझमींशी संबंधित २० हून अधिक ठिकाणी आयकर विभागाची धाड
मुंबई दि.१५ :- समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्याशी संबंधित सुमारे २० हून अधिक ठिकाणांवर आयकर विभागाने धाड टाकली.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मुंबई, वाराणसी, कानपूर, दिल्ली, कोलकोता, लखनौ आणि इतर काही ठिकाणी ही धाड टाकण्यात आली. आझमी यांच्या निकटवर्तीयांचाही यात समावेश असल्याचे समजते. बेनामी संपत्ती आणि काळा पैसा याबाबत ही कारवाई असल्याचे सांगण्यात येते.