श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणखी किती श्रद्धांचा बळी जाणार?
अभिनेत्री केतकी चितळेचा सवाल
मुंबई दि.१५ :- दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिने समाजमाध्यमांतून याविषयावर लिहिले आहे. आणखी किती श्रद्धांचा बळी जाणार? असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
श्रद्धाचा प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धाची सहा महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या केली होती. हे प्रकरण सोमवारी उघड झाले. प्रत्येकवेळी प्रेमात पडून आणि आंधळा विश्वास ठेवून स्वतःचाच बळी देणार आहात का? आता तरी झोपेतून जाग्या होणार का?असा प्रश्नही केतकीने विचारला आहे.