सक्तीचे धर्मांतर अत्यंत गंभीर
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे मत
नवी दिल्ली दि.१५ :- सक्तीचे धर्मांतर अत्यंत गंभीर प्रश्न असून हे प्रकार थांबविण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत आणि त्या दिशेने गंभीरपणे प्रयत्न करावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले.
अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. धमकावून किंवा आर्थिक प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्याची विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे.
न्या. एम. आर.शहा आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. सक्तीचे धर्मांतर थांबविले गेले नाही तर अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही न्यायालयाने दिला