पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा वाहनचालक आणि प्रवाशांना फटका
मुंबई दि.१४ :- मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली. महामार्गालगत मेट्रोचे काम सुरू असून त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली असल्याचे सांगण्यात येते.
मालाड कुरारपासून ते जोगेश्वरी तसेच गोरेगाव येथील विरवाणी इस्टेट ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटर रुग्णालयापर्यंतच्या वाहतुकीला फटका बसला. वाहतूक कोंडीत खासगी वाहने, बेस्ट बस, रिक्षा अडकल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले .