मुंबई विमानतळावर ३२ कोटी रुपयांचे ६१ किलो सोने जप्त
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- मुंबई विमानतळाच्या सीमा शुल्क विभागाने शुक्रवारी मुंबई विमानतळावर ३२ कोटी रुपयांचे ६१कोलो सोने जप्त केले. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना १४ दिवसांचीन्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. हे सर्व आरोपी कतार एअरवेजच्या विमानाने मुंबईत आले होते.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सोने तस्करीच्या टोळीशी संबंधित काही लोकांची नावे पोलिसांना दिली आहेत. तपास यंत्रणांकडून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाकडून न्यायालयात देण्यात आली.