ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१२ :- ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. दोन लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कारासाठी विविध व्यक्तींची नावे सुचविण्यात येतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून त्यातून पुरस्कार विजेत्याची निवड केली जाते. कोकण मराठी साहित्य परिषदेकडून कर्णिक यांचे नाव सुचविण्यात आले होते. यंदा एकूण पंधरा अर्ज दाखल झाले होते त्यातून कर्णिक यांची निवड करण्यात आली. करणे यांनी लिहिलेले ७५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी म्हणजेच येत्या २५ नोव्हेंबर रोजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कर्णिक यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील कामगिरीसाठी कर्णिक यांना जाहीर झाला आहे.