मनोरंजन

५३ व्या ‘इफ्फी’ महोत्सवात ‘इंडिया लॉकडाऊन’चा प्रिमिअर

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.१२ :- गोव्यात पणजी येथे येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणा-या ५३ व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. करोना साथ आणि अचानक पुकारलेली टाळेबंदी यामुळे देशभरात काय उलथापालथ झाली याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

चार प्रमुख पात्रांच्या माध्यमातून करोनाकाळ आणि टाळेबंदीतील कथा-व्यथा मांडणाऱ्या ‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटात श्वेता बसू प्रसाद, प्रतीक बब्बर, सई ताम्हणकर, आहाना कुम्रा आणि प्रकाश बेलावडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मधुर भांडारकरच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बबली बाऊन्सर’ या चित्रपटाप्रमाणेच ‘इंडिया लॉकाडऊन’ हा चित्रपटही थेट ‘झी ५’वर येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *