‘युटीएस’ ॲप तिकीट उपनगरी विभागासाठी अंतराच्या मर्यादेत वाढ
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१२ :- रेल्वेच्या अनारक्षित तिकीट बुकिंग सिस्टीम (युटीएस) भ्रमणध्वनी ॲपवरून तिकीट काढण्यासाठी सध्या असलेली अंतराची मर्यादा मुंबईतील उपनगरी विभागासाठी वाढविण्यात आली आहे.
सध्या ही अंतराची मर्यादा दोन किलोमीटर अशी होती ती आता वाढवून पाच किलोमीटर करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकापासून जास्तीत जास्त पाच किलोमीटर अंतरावरूनही प्रवाशांना उपनगरीय रेल्वेचे तिकीट काढता येणार आहे.
अंतराच्या मर्यादेत वाढ केल्यामुळे मुंबईतील उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.