मुंबई विमानतळावरील काळ्या-पिवळ्या प्रिपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ
मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणचा निर्णय
मुंबई दि.११ :- मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) मुंबई विमानतळावरील काळ्या-पिवळ्या प्रिपेड टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आंतरराष्ट्रीय विमानतळवरून प्रिपेड टॅक्सीने किमान सहा किलोमीटर अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी आता १४० रुपये, तर देशांतर्गत विमानतळाबाहेरून या टॅक्सीच्या चार किलोमीटर अंतरासाठी ९३ रुपये मोजावे लागणार आहेत.
याआधी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरून प्रिपेड टॅक्सीतून सहा किलोमीटर प्रवास करण्यासाठी १२७ रुपये, तर देशांतर्गत विमानतळवरून चार किलोमीटर प्रवासासाठी ८५ रुपये मोजावे लागत होते. आता या टॅक्सीने देशांतर्गत विमानतळावरून आठ किलोमीटर प्रवासासाठी १७९ रुपये, तर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ किलोमीटर प्रवासासाठी ३५८ रुपये मोजावे लागणार आहेत.