ठळक बातम्या

मुंबई आसपास संक्षिप्त

विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. भारत पाटणकर

मुंबई – येत्या १९ आणि ११ डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी कामगार चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.

 

सीताफळाचे उत्पादन घटले

यंदा राज्यातील सीताफळ उत्पादन निम्म्यावर आले असून दर्जाही खालावला आहे. राज्यभरात सुमारे एक लाख हेक्टरवर सीताफळाच्या बागा आहेत. सीताफळांना फुले येण्याच्या काळात जुलै-ऑगस्टमध्ये राज्यात सर्वदूर अतिवृष्टी, संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे झाडांना कळय़ा कमी आल्या आणि आलेल्या गळून पडल्या. फळाच्या वाढीच्या अवस्थेतही पाऊस होता. झाडाची मुळे सतत पाण्यात राहिल्यामुळे फळे मोठी झाली नाहीत. अनेक ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव झाला.

 

बॅंक ऑफ बडोदाच्या कर्ज व्याजदरात वाढ

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने निधीवर आधारित कर्ज व्याजदरात (एमसीएलआर) १५ आधार बिंदूंच्या वाढीची गुरुवारी घोषणा केली. नवीन सुधारित व्याजदर १२ नोव्हेंबरपासून लागू होत आहेत. बँकेचा एमसीएलआर ०.१० टक्क्याने वाढून आता ८.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे बँकेची गृह, वाहन, वैयक्तिक अशी सर्व प्रकारची कर्जे महाग होतील.

 

कल्याण परिमंडळात २०० कोटींहून अधिक थकबाकी

कल्याण दि.११ :- ऑक्टोबरअखेर ‘महावितरण’च्या कल्याण परिमंडळातील चार लाख ७० हजारांपेक्षाही अधिक ग्राहकांकडे २४१ कोटी ६४ लाख रुपये थकबाकी आहे. यात घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या देयकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. कल्याण परिमंडळामध्ये घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, पाणीपुरवठा योजना, शासकीय कार्यालये, पथदिवे तसेच अन्य असे एकूण ४ लाख ७० हजारांपेक्षाही अधिक ग्राहकांकडे ऑक्टोबर अखेरपर्यंत २४१ कोटी ६४ लाखांची वीज देयक थकबाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *