वाहतूक दळणवळण

नरीमन पॉइंट ते रायगड अवघ्या वीस मिनिटांत

एसीटेक” चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.११ :- मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम ८४ टक्के पूर्ण झाले असून आता नरीमन पॉईंटहून अवघ्या वीस मिनिटांत रायगड जिल्ह्यात पोहोचता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.

इकॉनॉमिक टाईम्सच्या आर्किटेक्चर, कन्स्ट्रक्शन, इंजिनिअरिंग या गोरेगाव येथील ‘एसटेक’ प्रदर्शनाचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनात एकूण ५०० दालने आहेत

रायगड जिल्ह्यातही ग्रोथ सेंटर बांधण्यात येणार असून लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन प्रास्ताविक केले या वेळी नरसी कलारिया यांचा मेक इन इंडिया आणि कौशल्य विकासातील कार्यासाठी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *