बँक कर्मचाऱ्यांचा १९ नोव्हेंबरला देशव्यापी संप
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.०९ :- अखिल भारतीय बँक कर्मचारी महासंघाने येत्या १९ नोव्हेंबर रोजी एक दिवसाच्या देशव्यापीस संपाची हाक दिली आहे. आजवरच्या परंपरेप्रमाणे द्विपक्षीय वाटावाटतीच्या पद्धतीपासून दूर जात बँक व्यवस्थापनाच्या एकतर्फी निर्णय लादण्याच्या मनमानीचा विरोध आणि सरकारच्या बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध म्हणून हा संप पुकारण्यात येणार आहे. विविध बँकांमधील सुमारे तीन लाखांहून अधिक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.