जनशताब्दी, भावनगर कोच्चुवेली या गाड्या आता विजेवर धावणार
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.०९ :- कोकण रेल्वे वरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, इंदूर कोच्चुवेली आणि भावनगर कोचुवेली या गाड्या बुधवारीपासून विजेवर धावायला सुरुवात झाली आहे.
सध्या कोकण रेल्वेवर एकूण ५० रेल्वे गाड्या धावत असून त्यापैकी १५ रेल्वे गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्यात येत आहेत. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून विद्युत इंजिनाच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने डिझेल इंजिनावर धावणाऱ्या सर्व गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्यात येणार आहेत.
सध्या दिवा रत्नागिरी पॅसेंजर नेत्रावती लोकमान्य टिळक टर्मिनस घरी परत कोकणकन्या आणि माडवी या लांब पाल्याच्या गाड्या विद्युत इंजिनावर धावत आहेत.