गणेश मंदिरातील दिपोत्सवास डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद
(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)
डोंबिवली दि.०८ :- डोंबिवलीतील गणेश मंदीर संस्थानाने गणेश मंदीरात त्रिपूरी पोर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या दिपोत्सवास उदंड प्रतिसाद डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मंदिराचा गाभारा आणि बाहेरील परिसर सुमारे दोन हजार पणत्यांनी उजळून निघाला. सोबत २०० महिलांचे सुक्त पठण सुरू होते.
दिपोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली यांच्यावतीने ‘खाद्यतेल दानयज्ञ’ उपक्रमाअंतर्गत एक हजार लिटर खाद्यतेल जमा झाले. हे तेल आसपासच्या परिसरातील वृध्दाश्रम, वसतीगृहे आणि मतीमंद मुलांच्या शाळांना वाटण्यात येणार आहे.