अनिल परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल- किरीट सोमय्या यांची माहिती
मुंबई दि.०८ :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर परब यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. परब यांची १३ तास चौकशीही करण्यात आली होती.
परब यांनी खोटी कागदपत्रे सादर करत शासनाची फसवणूक केली असल्याचा ठपकाही किरीट सोमय्या यांनी ठेवला आहे. रत्नागिरीच्या दापोली येथे अनिल परब यांचं हे साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसॉर्ट आपले नसल्याचे परब यांनी वारंवार स्पष्ट केले असले तरी हे रिसॉर्ट परब यांचेच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.