मुंबई विमानतळावर ६ किलो हेरॉइन जप्त
मुंबई दि.०८ :- केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात ‘सीबीआय’ने सोमवारी मुंबई विमानतळावर एका परदेशी नागरिकाकडून ६ किलो हेरॉईन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १८ कोटी रुपये इतकी आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जसिंकी असे असून तो पोलंड देशाचा नागरिक आहे. आरोपी मुंबईहून झिम्बाब्वेमार्गे इथिओपियाला जात होता. सीबीआयला इंटरपोलकडून माहिती मिळाल्यानंतर त्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. आरोपीची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.