‘सनी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
१८ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.११ :- ‘झिम्मा’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर ‘झिम्मा’ची टीम प्रेक्षकांसाठी आता एक नवीन भेट घेऊन आली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी चित्रपट येत्या’ १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनीची निर्मित आहे.