ठळक बातम्या

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद इब्राहिम आणि चार साथीदारांविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई दि.११ :- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या चार साथीदारांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) शनिवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले. दाऊद टोळीने उकळलेल्या खंडणीचा वापर दहशतवादासाठी झाल्याचे समोर आले आहे.

तसेच, मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी दाऊदकडील खंडणीच्याच पैशाचा वापर केला गेला, असा आरोप ‘एनआयए’ने केला आहे.’एनआयए’कडून दाऊद इब्राहिमच्या तीन साथीदारांना अटक केली असून दाऊदसह आणखी काही जणांना आरोपी म्हणून शोध सुरू आहे.

श्रीमंत लोकांकडून खंडणी उकळून त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता. अटक करण्यात आलेल्या तिघांना हवालामार्फत पैसे मिळत होते. या पैशाचा वापर मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी झाल्याचा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *