मंत्रालयातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.०४ :- मंत्रालयातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गुरुवारी सायंकाळी त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. राज्य सरकारच्या आदेशानुसार, परिवहन आणि बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यांची वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी (लेखा आणि कोषागार) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची परिवहन आणि बंदरे विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. वित्त विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांची ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवपदी, तर ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.