पुढील महिन्यात मुंबईत ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई’ अभियान
मुंबई दि.०३ :- पुढील महिन्यात मुंबई उपनगर जिल्ह्यातील १५ प्रभागांमध्ये ‘स्वच्छ मुंबई स्वस्थ मुंबई’ अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. उपक्रमाच्या पूर्वतयारी बाबत आयोजित बैठकीत लोढा बोलत होते. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकारी चंदा जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचा :- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
हे अभियान बृहन्मुंबई महापालिकेतर्फे राबविण्यात येणार असून यात सर्व शासकीय/निमशासकीय/खाजगी संस्थाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मुंबई उपनगरातील पंधरा प्रभागातील सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना, स्वयंसेवी संस्था, शासनाचे सर्व विभाग, नागरिकांनी आपापल्या प्रभागात शक्य होईल तिथे आपला परिसर, शाळा ,महाविद्यालय, पोलीस ठाणे, सार्वजनिक ठिकाणे, सागरी किनारे यांची स्वच्छता करावयाची आहे. दर शनिवार, रविवारी जमेल तितका वेळ श्रमदान करावे, प्रभाग पातळीवर स्वच्छता उपक्रम राबवावेत, असे आवाहनही लोढा यांनी केले.
हेही वाचा :- केंद्रीय राखीव पोलीस दलात महिला अधिकारी महानिरीक्षक
मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या शाळा, महाविद्यालये, सहकारी गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे आणि प्रत्येक शासकीय विभागाच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.