केंद्रीय राखीव पोलीस दलात महिला अधिकारी महानिरीक्षक
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.०३ :- केंद्रीय राखीव पोलीस दलातील ॲनी अब्राहम, सीमा धुंडिया या महिला अधिकाऱ्यांना ‘महानिरीक्षक’ दर्जा मिळाला आहे. ॲनी अब्राहम यांच्यकडे शीघ्र कृती दलाच्या महानिरीक्षक तर सीमा धुंडिया यांच्याकडे बिहार विभागाच्या महानिरीक्षक अशी जबाबदारी देण्यात आली आहे. या दोघीही केंद्रीय राखीव पोलीस दलात १९८७ मध्ये दाखल झाल्या होत्या. महानिरीक्षक दर्जा मिळविणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.