‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.०३ :- महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाला. अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे.
चित्रपटात विराज मडके, जय बुधाने, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सत्यम मांजरेकरआणि प्रवीण तरडे हे कलाकार सात वीरांच्या भूमिकेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या कलाकारांनख चित्रपटात वापरण्यात येणारी शस्त्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, चित्रपटाचे निर्माते वसीम कुरेशी आदी उपस्थित होते पुढील महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून २०२३ च्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.