ठळक बातम्या

महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०३ :- महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत,अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमातून दिली. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा महासंकल्प राज्य शासनाने केला आहे. या महासंकल्पपूर्तीचे पहिले पाऊल म्हणून सुमारे २ हजार जणांना नियुक्तपत्रे प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम गुरुवारी सकाळी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता.‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले. मोदी यांनी त्यांच्या भाषणात उपरोक्त माहिती दिली.

हेही वाचा :-गुजरात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले – १ आणि ५ डिसेंबरला मतदान, ८ डिसेंबरला मतमोजणी

स्टार्टअप, लघु उद्योगांना सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येत असून देशभरात पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात २ लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असून यापैकी काही प्रकल्पांवर काम सुरु आहे आणि काही प्रकल्पांवर काम सुरु होणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला असल्याचेही मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा :- नद्यांच्या प्रदूषणाबरोबरच आपले विचार आणि संस्कारही प्रदूषित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान महाराष्ट्र राज्यासाठी हा आनंदसोहळा आहे.‌ आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ७५ हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात येतील, अशी घोषणा आम्ही केली होती. त्याची सुरुवात या महासंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने झाली आहे. टप्प्याटप्प्याने पुढील भरती केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात नोकरभरतीच्या प्रक्रियेसाठी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या दोन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. देशातील ८० हजार स्टार्ट अपपैकी १५ हजार स्टार्ट अप कंपन्या महाराष्ट्रातील आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *