महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता २९ नोव्हेंबर रोजी
नवी दिल्ली दि.०१ :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटा यांच्यातील वादामुळे निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली. आता ही सुनावणी येत्या २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हेही वाचा :- मतपत्रिका, मतदान यंत्रांवर निवडणूक चिन्हाऐवजी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, नाव देण्याची मागणी
राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट, आमदारांची अपात्रता आदी मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एम. आर. शहा, कृष्ण मुरारी, हिमा कोहली, पी. एस. नरसिंह यांच्या घटनापीठापुढे मंगळवारी (१ नोव्हेंबर) ही सुनावणी होणार होती.
हेही वाचा :- नद्यांच्या प्रदूषणाबरोबरच आपले विचार आणि संस्कारही प्रदूषित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यासाठी घटनापीठाने तीन आठवड्यांची मुदत दिली. या मुदतीत ठाकरे आणि शिंदे गटाला न्यायालयात कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतरच घटनापीठाकडून या प्रकरणी सलग सुनावणी घेतली जाण्याची शक्यता आहे.