साहित्य- सांस्कृतिक

साहित्य अकादमीचे माजी प्रादेशिक सचिव प्रकाश भातंब्रेकर गौरव विशेषांकाचे प्रकाशन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०१ :- साहित्य अकादमीचे माजी प्रादेशिक सचिव प्रकाश भातंब्रेकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन जेष्ठ प्रकाशक रामदास भटकळ आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. या गौरव विशेषांकाचे संपादन साहित्यिक प्रा.डाॅ. मनोहर यांनी केले आहे.

हेही वाचा :- नद्यांच्या प्रदूषणाबरोबरच आपले विचार आणि संस्कारही प्रदूषित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शब्दसृष्टी त्रैमासिक आणि मणीबेन एम पी शाह कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाचा हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम माटुंगा पूर्व येथील परमेश्वरी देवी गोवर्धनदास गरोडिया शैक्षणिक संकुलातील सभागृहात झाला. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉक्टर सूर्यबाला, प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर दिलीप झवेरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ उपस्थित होते.

हेही वाचा :- डिजिटल रुपया आजपासून बाजारात

मान्यवरांच्या हस्ते प्रकाश भातंब्रेकर यांना सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास ‘ग्रंथाली’ चे दिनकर गांगल, डाॅ.अनिल गायकवाड, प्रा.मुुकुंंद आंधळकर, आशारानी, साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने, भातंब्रेकर कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *