पिसे जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे मुंबईत १० नोव्हेंबरपर्यंत १० टक्के पाणीकपात
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.०१ :- बृहन्मुंबई महपालिकेच्या पिसे जल शुद्धीकरण प्रकल्पातील दुरुस्तीच्या कामांमुळे संपूर्ण मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात येत्या १० नोव्हेंबरपर्यंत १० टक्के कपात केली जाणार आहे.
हेही वाचा :- डिजिटल रुपया आजपासून बाजारात
भिवंडीतील पिसे पांजरापूर येथे बृहन्मुंबई महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टिम मधील ‘एअर ब्लॅडर’ बदलण्याचे काम आजपासून हाती घेण्यात येणार असून ते १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
हेही वाचा :- दीड हजारांहून अधिक वेळा विनाकारण साखळी खेचल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
त्यामुळे ही पाणीकपात करण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे आणि भिवंडी महापालिकांना होणा-या पाणीपुरवठ्यावरही या दुरुस्तीच्या कामाचा परिणाम होणार आहे.