डिजिटल रुपया आजपासून बाजारात
मुंबई दि.०१ :- रिझर्व बँकेचा बहुचर्चित डिजिटल रुपया अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) आज मंगळवारपासून बाजारात दाखल झाला आहे. ‘सीबीडीसी’ सध्या तरी प्रायोगिक तत्वावर असून सरकारी रोख्यांमधील व्यवहारांसाठी याचा वापर केला जाणार आहे.
हेही वाचा :- ट्विटरकडून भारतातील मोजक्या लोकांना ‘ट्विट एडिट’ पर्याय उपलब्ध
या व्यवहारांसाठी स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी बँक, एचएसबीसी बँक या बँकांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यात रिटेल व्यवहारांसाठी निवडक ठिकाणी सीबीडीसीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला जाणार आहे रिटेल व्यवहारांसाठी ग्राहक आणि विक्रेता किंवा व्यापारी अशा गटांचाही समावेश केला जाईल.
हेही वाचा :- मुंबईसह राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ ला सुट्टी! – राज्यात थंडीचे आगमन
यामुळे अंतर्गत व्यवहार अधिक सोपे होणार आहेत. चालू आर्थिक वर्षात डिजिटल रुपया बाजारात आणला जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना करण्यात आली होती.