मनोरंजन

नद्यांच्या प्रदूषणाबरोबरच आपले विचार आणि संस्कारही प्रदूषित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०१ :- आपली संस्कृती आणि परंपरा या सगळ्यांचा थेट संबंध नदीशी जोडला गेलेला आहे दुर्दैवाने आपण नदीचे महत्व विसरलो त्यामुळे नद्या तर प्रदूषित झाल्यास पण त्याचबरोबर आपले विचार आणि संस्कारही प्रदूषित झाले आहेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

हेही वाचा :- राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय मंथन शिबीर

निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. चित्रपटात जितेंद्र जोशी नीना कुलकर्णी संजय मोने प्रियदर्शन जाधव गौरी नलावडे आणि विक्रम गोखले हे प्रमुख कलाकार आहेत. ‘गोदावरी’ चित्रपटाच्या निमित्ताने नदीशी असलेले आपले नाते पुनरुज्जिवित करता येईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :- बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा ‘जागर’!

केंद्र शासनाने ‘कान’ जागतिक चित्रपट महोत्सवासाठी भारतीय भाषांमधील सहा चित्रपटांची निवड केली होती त्यात ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटाचा समावेश होता. इतरही काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘गोदावरी’ चित्रपट सादर झाला होता. ‘गोदावरी’ चित्रपट येत्या ११ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *