शरद पवार रुग्णालयात दाखल
मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईत ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात त्यांच्यावर पुढील तीन दिवस उपचार केले जाणार असून त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांना भेटण्यासाठी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबीर येत्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे होणार आहे. या शिबिरात पवार मार्गदर्शन करणार आहेत. मात्र आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार शिर्डी येथे उपस्थित राहू शकतील की नाही? असा प्रश्न पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय मंथन शिबीर
पक्षाच्या सूत्रांकडून मात्र शिर्डी येथील शिबीरात पवार उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.