पर्यटन

राणीच्या बागेला ऑक्टोबर महिन्यांत अडीच लाख पर्यटकांची भेट

– ३० ऑक्टोबरला ३१ हजार २३२ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद

मुंबई आसपास प्रतिनिधी

मुंबई- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ‌आणि प्राणिसंग्रहालय अर्थातच राणीच्या बागेला १ ते ३० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अडीच लाख पर्यटकांनी भेट दिली. यातून राणीच्या बागेला एक कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीत येथे भेट देणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी उद्यापासून – महाराष्ट्र सागरी मंडळाचा उपक्रम

राणीच्या बागेचे नूतनीकरण झाल्यानंतर येथे विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले असून खास पेंग्विन विभागही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय मुंबईतीलच नव्हे, तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी विशेषतः लहान मुलांचे विशेष आकर्षण ठरले आहे.

गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाण्यांचे जतन आवश्यक- राज्यपाल कोश्यारी

३० ऑक्टोबर २०२२ या दिवशी ३१ हजार २३२ पर्यटकांनी येथे भेट दिल्याची विक्रमी नोंद झाली. त्यातून सुमारे ११ लाख ५ हजार ९२५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर २९ मे २०२२ या दिवशी ३० हजार ३७९ पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली होती.‌

मंदिरांत सादर केलेले संगीत आणि नृत्यामळे आध्यात्मिक प्रगतीला चालना

२९ आणि ३० ऑक्टोबर २०२२ या दोन दिवसांत ५८ हजार ६२४ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून २० लाख ९३ हजार ९५० रुपये इतके विक्रमी महसुली उत्पन्न प्राप्त झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांसोबत ‘वर्षा’वर दिवाळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *