‘बिग बॉस’ च्या घरात ‘वाइल्ड कार्ड’ द्वारे अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिचा प्रवेश
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस- मराठी’ या कार्यक्रमात ‘वाईल्ड कार्ड’च्या माध्यमातून अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिचा प्रवेश झाला आहे. ‘वाईल्ड कार्ड’ द्वारे कार्यक्रमात प्रवेश करणारी ती पहिली स्पर्धक ठरली आहे.
रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप यांचे निधन
रविवारी (३० ऑक्टोबर) रात्री प्रसारित झालेल्या भागात स्नेहलता वसईकर हिचा प्रवेश झाला. बिग बॉसच्या घरात एकूण १६ स्पर्धक सहभागी झाले असून दोन आठवड्यानंतर अभिनेता निखिल राजेशिर्केला घराबाहेर पडावे लागले. कार्यक्रमातून बाद होणारा तो पहिला स्पर्धक ठरला. त्यानंतर अभिनेत्री मेघा घाडगे आणि काल रविवारी योगेश जाधव बाद झाला.
‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’त प्रशांत दामले – उद्या (सोमवारी) सोनी मराठीवर प्रसारण
स्नेहलता वसईकरने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये ‘सोयरा बाईसाहेब’ भूमिका साकारली होती. काही ‘बोल्ड’ छायाचित्रांमुळे तिच्यावर टिका झाली होती.
संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरला! – डोंबिवलीकर रसिकांना ‘संगीत रस सुरस’ मेजवानी