राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय मंथन शिबीर
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.३० :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय मंथन शिबीर येत्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे सर्व सदस्य, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष शिबीराला उपस्थित
राहणार आहेत.
हेही वाचा :- बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा ‘जागर!’
शिबीराच्या पहिल्या दिवशी शरद पवार स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित कार्यकर्त्यांना पवार मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा :- मतपत्रिका, मतदान यंत्रांवर निवडणूक चिन्हाऐवजी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, नाव देण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिकातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सदस्य यांच्याशी समन्वय साधून स्थानिक पातळीवर पक्षाच्या ताकदीचा आढावा घेण्यास सांगण्यात येणार आहे.