संस्कृति

श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी प्रवचनकार अलका मुतालिक यांची निवड

(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.३० :- डोंबिवलीचे ग्रामदैवत अशी ओळख असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी प्रवचनकार अलका मुतालिक यांची निवड करण्यात आली.

गणेश मंदिर संस्थानच्या आगामी पाच वर्षासाठीची कार्यकारिणीसाठी नुकतीच निवडणूक पार पडली.‌ कार्यकारिणीत एकूण ११ सदस्य असून कार्यकारिणीची मुदत २०२७ पर्यंत आहे.

श्री गणेश मंदिर संस्थानचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे

सनदी लेखापाल सुहास आंबेकर (उपाध्यक्ष), प्रवीण दुधे (सचिव), अजय कानिटकर (कोषाध्यक्ष), डाॅ. उत्कर्ष भिंगारे (सहसचिव)
वैद्य विनय वेलणकर, राहुल दामले,श्रीपाद कुळकर्णी, मंदार हळबे, आनंद धोत्रे, गौरु कुंटे (सर्व कार्यकारिणी सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *