मतपत्रिका, मतदान यंत्रांवर निवडणूक चिन्हाऐवजी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, नाव देण्याची मागणी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.३० :- मतपत्रिका आणि मतदान यंत्रांवर निवडणूक चिन्ह ऐवजी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, नाव वय, आणि छायाचित्र देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. उद्या सोमवारी याचिकेवर सुनावणी होणार आहे.
ॲड. अश्विनी कुमार उपाध्याय यांनीही याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश उदय लळीत, न्यायमूर्ती एस आर भट, न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मतदार यंत्रावर जर उमेदवाराचे वय शैक्षणिक पात्रता देण्यात आली तर हुशार आणि प्रामाणिक उमेदवाराला मत देण्याबाबत मतदारांमध्ये विचार केला जाईल, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.