ठळक बातम्या

मध्य रेल्वेवरील विविध स्थानकांना अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.३० :- मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक दर्जाचे नवीन तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेचा मुंबई उपनगरी विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत, कसारा, खोपोली, पनवेलपर्यंत आहे. येत्या
मार्च २०२३ पर्यंत कॅमेरे बसविण्याचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा :- मुंबईसह राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ ला सुट्टी! – राज्यात थंडीचे आगमन

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण स्थानकांत तसेच भायखळा, परळ, घाटकोपर, मुलुंड, दिवा, कोपर, डोंबिवली, कसारा, इगतपुरी, खोपोली, वडाळा, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, पनवेल यासह अन्य स्थानकातही अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा :- श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी प्रवचनकार अलका मुतालिक यांची निवड

काही ठिकाणी संपूर्ण नव्याने तर काही ठिकाणी सध्या आहेत ते कॅमेरे बदलले जाणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या मुंबई विभागातील ७५ हून अधिक रेल्वे स्थानकात सुमारे ३ हजार १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *