बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा ‘जागर!’
नोव्हेंबर महिन्यात मुंबई आणि उपनगरांमध्ये जनजागरण
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.३० :- बृहन्मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे मुंबई आणि उपनगरात नोव्हेंबर महिन्यात ‘जागर मुंबईचा’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप- मुंबईचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
नवमतदार आणि तरुणांचे डोकी भडकविण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेकडून खोटी माहिती पसरविली जात आहे. निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानेच ‘मराठी मुस्लिम’ असा शब्द प्रयोग करून करून मराठी मतदारांना भुलविण्याचा आणि मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याचा शिवसेना प्रयत्न करत आहे. या सर्वांला प्रत्युत्तर देण्यासाठी जागरयात्रेचे केले असल्याचेही शेलार यांनी सांगितले.