‘बालरंग’ त्रैमासिकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई दि.२९ :- लहान मुलांमध्ये वाचनाची आणि लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बालरंग या त्रैमासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर करण्यात आले.
भ्रमणध्वनी व तंत्राच्या आहारी जात असलेल्या आजच्या पिढीच्या हाती दर्जेदार वाचन साहित्य मिळावे व त्यायोगे मुलांमध्ये वाचन संस्कृती निर्माण होऊन मुलांना स्वतः लेखन करण्यासाठीही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शलाका प्रकाशनच्या वतीने बालरंग हे त्रैमासिक सुरू करण्यात आले आहे.
यावेळी शलाका प्रकाशनचे प्रकाशक भाऊ कोरगावकर, बालरंगचे मुख्य संपादक श्रीनिवास नार्वेकर, आर्ट डिझाईनर सुप्रिया चव्हाण, जयदीप हांडे, निलेश कोरगावकर, महादेव काटे उपस्थित होते.