मध्य रेल्वेवर उद्या (रविवारी) मेगा ब्लॉक
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२९ :- दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी, ३० ऑक्टोबर रोजी माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर सकाळी ११. ५ ते दुपारी ३.५५ या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गावरील जलद लोकल सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
हार्बरव मार्गावरही कुर्ला-वाशी दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत होणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला, वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.