रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप यांचे निधन
मुंबई दि.२९ :- रॅम्बो सर्कसचे संस्थापक पी. टी. दिलीप (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन पुत्र, सून, विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे.
पी. टी. दिलीप हे मूळचे केरळचे. रत्नागिरी येथे शिक्षण झालेल्या दिलीप यांनी नव्वदच्या दशकात तीन लहान सर्कस एकत्र केल्या. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांनी स्थापन केलेल्या रॅम्बो सर्कसने संपूर्ण आशियाचा दौरा केला.
सर्कसच्या माध्यमातून पुण्याचे नाव जगप्रसिद्ध केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेतर्फे १९९२ मध्ये पी. टी. दिलीप यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सर्कसमध्ये प्राण्यांच्या खेळांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे उताराला लागलेल्या सर्कसला ऊर्जितावस्था यावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले.