ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे निधन
मुंबई- ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या.
दिवंगत मृणालिनी जोशी या पावस येथील स्वामी स्वरूपानंदांच्या अनुग्रहित होत्या. त्यांच्या जीवनावर ‘अमृतसिद्धी’ हे पुस्तक त्यांनी लिहिले होते.
मृणालिनी जोशी या त्यांच्या लहानपणीच रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सान्निध्यात आल्या. त्यांची मानसकन्या होण्याचे भाग्य त्यांना लाभले.
मृणालिनी जोशी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर ‘अजिंक्य मी!अवध्य मी!’ शंकर महाराजांवर ‘शंकरलीला’, भगतसिंग यांच्यावरील ‘इन्किलाब आणि गोळवलकर गुरुजींच्या जीवनावरील लिहीलेली ‘राष्ट्राय स्वाहा’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
—-