व्हॉट्स अपवर वाचता येणारा आगळा दिवाळी अंक ‘ऑल द बेस्ट’!
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२७ :- मराठी भाषा आणि साहित्याला समृद्ध दिवाळी अंकांची परंपरा लाभली असून दरवर्षी विविध विषयांवरील दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. उद्वेली बुक्सने प्रकाशित केलेला ‘ऑल द बेस्ट’ हा दिवाळी अंक आगळा,वेगळा असून तो ‘व्हॉट्स अप’ वर वाचता येणार आहे.
https://tinyurl.com/All-the-Best या लिंकवर क्लिक केले की हा दिवाळी अंक वाचता,पाहता आणि चक्क ऐकताही येणार आहे.
हा दिवाळी अंक ‘स्मार्ट मासिक’ म्हणून सादर करण्यात आला असून अंकातील मजकूर, रेखाचित्रे, फोटो, ध्वनिफीती, ध्वनिचित्रफिती एकत्रित पाहायला मिळणार असल्याचे उदवेली बुक्सचे संसथापक विवेक मेहेत्रे यांनी सांगितले. अंकात कथा ,वात्रटीका, विनोद, व्यंगचित्र आदी विविध प्रकारचे साहित्य असून हा अंक ॲंड्राईड भ्रमणध्वनी, आयफोन, आयपॅड, डेस्कटॉप, लॅपटॉपवर वाचता, पाहता आणि ऐकता येणार आहे.