साहित्य- सांस्कृतिक

ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांचे ९३ व्या वर्षात पदार्पण

(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.२६ :- निसर्गातील रंग, रूप, आकार याबाबतची भावोत्कटता आणि माणसातील क्रौर्य, हिंसेविषयीची करुणार्तता कवितेतून मांडणारे ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर यांनी आज (२६ ऑक्टोबर २०२२) ९२ वर्षे पूर्ण करून ९३ व्या वर्षात पदार्पण केले.‌ अगदी तरुण वयातच धामणस्कर यांनी कविता लेखनाला सुरुवात केली.‌ सत्यकथा, मौज, दीपावली, हंस, मराठवाडा आदी मासिके, नियतकालिकांमध्ये धामणस्कर यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत. मौज प्रकाशनाने धामणस्कर यांचे ‘प्राक्तनाचे संदर्भ’, ‘बरेच काही उगवून आलेले’, ‘भरून आलेले आकाश’ हे कविता संग्रह प्रकाशित केले असून ग्रंथालीच्या ‘दशकाची कविता’ मधील दहा निवडक कवींच्या काव्य संकलनातही धामणस्कर यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा :- चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम संकल्पना पुढील वर्षापासून महाराष्ट्रात – प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे

आकाशवाणी, दूरदर्शनवरही त्यांचे कवितावाचन झाले आहे.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता. धाणस्कर यांच्या “प्राक्तनाचे संदर्भ” या कवितासंग्रहाला राज्य सरकारचा केशवसुत पुरस्कार तर “बरेच काही उगवून आलेले” या कवितासंग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळाले आहे. साहित्य अकादमीच्या ‘साठोत्तरी मराठी कविता’ या खंडात त्यांच्या ५ कवितांचा समावेश होता.धामणस्कर यांच्या कवितांचा हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड इंग्रजी भाषांत अनुवाद झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *