ठळक बातम्या

मुंबई आसपास संक्षिप्त

पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली

मुंबई दि.२६ :- मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सातही धरणात ९७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आदी धरणांमध्ये सध्या १४ लाख ८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.

मुंबई आणि राज्यातील वीज मागणीत घट

मुंबई – मुंबई आणि राज्याच्या वीज मागणीत मोठी घट झाली आहे .२५ ऑक्टोबर या दिवशी राज्याची वीज मागणी १४ हजार तर मुंबईची वीज मागणी २ हजार ५०० मेगावॅटच्या खाली घसरली होती. हवेतील गारवा वाढल्याने ही मागणी कमी झाल्याचे सांगण्यात येते.

प्रथमवर्ष अभियांत्रिकी- २३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

मुंबई – अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत ८९ हजार ९२१ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले होते.‌ त्यापैकी २३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.‌ उरलेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवेशाची आणखी एक संधी देण्यात येणार आहे.‌

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या ४० आमदारांसह अयोध्येला जाणार आहेत. हा अयोध्या दौरा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. हा दौरा आठवडाभराचा असणार आहे.‌

कडोंमपाहद्दीत क्षयरोग रुग्णांच्या संख्येत वाढ
डोंबिवली– कडोंमपा हद्दीत २ हजार ८३ रुग्ण उपचार घेत असून वर्षभरात १३५ रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांवर कल्याण डोंबिवली क्षय रोग निदान आणि उपचार विभागाच्या देखरेखीखाली रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *