साहित्य- सांस्कृतिक

संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरला! – डोंबिवलीकर रसिकांना ‘संगीत रस सुरस’ मेजवानी

मुंबई आसपास प्रतिनिधी
डोंबिवली- मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ डोंबिवलीत पुन्हा एकदा अवतरला.‌ निमित्त होते मधुमालती एंटरप्रायझेस, रघुलिला एंटरप्रायझेस आणि वेध अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘संगीत रस सुरस’ चे.‌ या कार्यक्रमाची संकल्पना आदित्य बिवलकर यांची होती.

‘पंचतुंड नररुंडमालधर’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. केतकी चैतन्य, ऋषिकेश अभ्यंकर, ओंकार प्रभुघाटे, धनंजय म्हसकर, संपदा माने आदी गायक कलाकारांनी संगीत नाटकातील विविधरंगी नाट्यगीते वेशभूषेसह सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

यात स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, होनाजी बाळ, मंदार माला, मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, कुलवधू या संगीत नाटकातील राधाधर मधु मिलिंद,प्रिये पहा, नाथ हा माझा,खरा तो प्रेमा, कर हा करी, श्रीरंगा कमलाकांता, सत्यवदे वचनाला नाथा, कशी या त्यजू पदाला, देवाघरचे कुणाला, गर्द सभोवती रान साजणी आदी नाट्यपदांचा समावेश होता.‌

नटी आणि सूत्रधाराच्या वेशभूषेतील धनश्री लेले, डॉ. प्रसाद भिडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.‌ तर संगीतसाथ नीरंजन लेले आणि प्रसाद पाध्ये यांची होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *