सामाजिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांसोबत ‘वर्षा’वर दिवाळी

– प्रत्येक शेतकऱ्याचे औक्षण
– कृषि कृती विकास आराखडा तयार करणार
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई- मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याने मंगळवारी अनोखी दिवाळी अनुभवली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबीयांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे औक्षण करीत त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम संकल्पना पुढील वर्षापासून महाराष्ट्रात – प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे

राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि कृती विकास आराखडा तयार करीत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरला! – डोंबिवलीकर रसिकांना ‘संगीत रस सुरस’ मेजवानी

राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यातून प्रातिनिधीक स्वरुपात शेतकरी बांधव सपत्नीक या अनोख्या सोहळ्याला उपस्थित होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गडचिरोली येथील दौरा आटोपून मुख्यमंत्री वर्षावर आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्नी लता, खासदार पुत्र डॉ. श्रीकांत, स्नुषा वृषाली यांच्यासह प्रत्येक शेतकरी कुटुंबांचे जागेवर जाऊन औक्षण केले. त्यांना साडी- चोळी, धोतर आणि भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

कर्तव्यावरील शहीद ‘प्रकाशदुतां’चे स्मरण – वीज कंत्राटी कामगार संघातर्फे आयोजन

शेतकरी बांधवांनी पारंपारिक शेतीला आधुनिकतेचे बळ देऊन कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

डोंबिवलीच्या फडके रस्त्यावर तरुणाईचा उत्साह! -‘युवा भक्ती शक्ती दिन’ साजरा

मुख्यमंत्र्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात दुधे दाम्पत्याला दिवाळी फराळ भरवला. वर्षावरील हिरवळीवर शेतकऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.अमरावतीच्या अर्चना सवाई, अहमदनगरचे सतीष कानवडे या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

गेल्या नऊ वर्षांपासून पंतप्रधान मोदींची दिवाळी सैनिकांसोबत – यंदाची दिवाळी कारगिलमध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *